
आपल्या लूक्सने आणि दमदार अभिनयाने बॉलिवूडवर छाप सोडून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन. त्याचा आज ३७ वा वाढदिवस आहे. वरुणने करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करताना दिसला. सोबतच वरुणने काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये त्याच्या लूक्स, अभिनय आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असतो. आजपर्यंतच्या त्याच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरडूपर हिट चित्रपट दिले आहेत.








