सांगली हादरली! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

0
14
सांगली हादरली! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या


Sangli Sudhar Khade Murder : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार ऐन रंगात आला असताना सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख तर सध्याचे भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावर आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता, याच वादातून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले.



Source link