सांगली -सातारकरांनो सावधान! कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवला, कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क

0
2


Koyna Dam water Release: कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. परिणामी, धरण प्रशासनाने आज (16 जुलै) पुन्हा एकदा धरणातून विसर्गात मोठी वाढ करत एकूण 11,400 क्यूसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Koyna Dam)

धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, कालपासून कोयनामधून दररोज सुमारे 5,500 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात होते. मात्र, आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. हे दरवाजे दीड फूटावरून थेट साडेतीन फूटावर उघडण्यात आले असून, यामुळे 9,300 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय पायथा जलविद्युत प्रकल्पातून आणखी 2,100 क्युसेस पाणी सोडले जात असल्याने, एकूण विसर्ग 11400 क्युसेसवर पोहोचला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोयनातून सोडले जाणारे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे सांगलीतील कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस आणि मिरज तालुक्यातील गावांसह साताऱ्यातील कोयना काठच्या गावांनाही धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, सतर्क रहावे आणि अधिकृत सूचना ऐकाव्यात, असे आवाहन केले आहे. स्थानिक यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

धरण क्षेत्रात जोरदार पावसाचा मारा सुरूच असून, धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे, सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठची गावे, तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीलगतची गावे धोक्याच्या झोनमध्ये येऊ शकतात. प्रशासनाने स्थानिक नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असा इशारा दिला आहे. सांगली, कोरेगाव, कराड आणि पाटण तालुक्यांतील नागरिकांना विशेष सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयनातील विसर्गात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क रहावे असा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक यंत्रणांनी सतत धरणाच्या स्थितीवर नजर ठेवली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा:

Pune Crime news: बुधवार पेठेत जाणाऱ्यांचा घरापर्यंत पाठलाग, 20 हजार दे नाहीतर बदनामीची धमकी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा



Source link