सरसंघचालकजी, आधी जाती-जातीत द्वेष पसरवणाऱ्या फडणवीसांचे कान उपटा; सुषमा अंधारे यांची जहरी टीका

0
4
सरसंघचालकजी, आधी जाती-जातीत द्वेष पसरवणाऱ्या फडणवीसांचे कान उपटा; सुषमा अंधारे यांची जहरी टीका


सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात दणकेबाज भाषण करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की, द्वेष संपला पाहिजे. सांप्रदायिक विभाजन होता कामा नये. दुर्बल घटकांना सोबत घेऊन देश मजबूत झाला पाहिजे. सरसंघसंचालकजी तुमचं म्हणणं सर आँखोपर. पण तुम्ही हे सांगताय कुणाला? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. आधी देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा. महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे संप्रादायिक विभाजन करू नका, त्यांनी जातीत जात ठेवली नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली.



Source link