
मायलेक
आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ हा चित्रपट वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी पदार्पण करत आहे. हा चित्रपट १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, संजय मोने हे कलाकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.






