शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार

0
5


सातारा : शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांनी  साताऱ्यात (Satara News)  केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम यांना ताब्यात घेतलं असून या प्रकणाचा तपास सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई  यांच्या निकटवर्तीय म्हणून मदन कदम यांची ओळख आहे. आरोपी मदन कदम हा ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मदन कदम हा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखला जातो. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोळीबारावेळी आरोपी मदनसह त्याची दोन मुले  सोबत असल्याचे समोर आले आहे. ही घटना मदन कदम यांच्या गुरेघर येथील फार्महाऊसवर घडली. मृत व्यक्ती  या गुरेघर पासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या कोरडेवाडी गावातील आहेत. चार दिवसापूर्वी किरकोळ कारणातून मदन कदम आणि कोरडेवाडी गावातील लोकांसोबत वाद झाला होता.  श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यासह काही ग्रामसौथ मदन यांना जब विचारण्यासाठी गेले आसता मदन याने बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर दोन्ही मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात सुमारे दोन तास पडले होते. पोलिसांनी येऊन हे मृतदेह ताब्यात घेतले.  गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.



Source link