
राज्यातील सर्व शिक्षकांना आता त्यांच्या सोयीनुसार तसेच पसंतीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः अहमदनगर व जळगावसह अनेक जिल्ह्यांतील शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी हा प्रश्न सरकारकडे मांडला आणि अथक प्रयत्नांनंतर यश आले आहे. हा निर्णय त्वरीत लावल्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आ. सत्यजीत तांबे यांनी आभार मानले.





