
Symptoms of brain artery blockage in early stage: मेंदूच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होऊ लागला, की शरीर आधीच काही सूचनांद्वारे आपल्याला इशारा देत असतो. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर अवस्थेला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच, लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मेंदूतील नस ब्लॉक होण्यामागचं कारण काय असतं?
मेंदू हे आपल्या शरीराचं नियंत्रण केंद्र आहे. शरीराच्या प्रत्येक हालचालीसाठी मेंदू आदेश पाठवतो आणि प्रत्येक क्रिया त्याच्या नियंत्रणात असते. त्यामुळे, मेंदूशी संबंधित कोणतीही समस्या शरीरासाठी गंभीर ठरू शकते. मेंदूच्या नसांमध्ये अडथळा (ब्लॉकेज) निर्माण झाल्यास, ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वं मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे मेंदूचं कार्य थांबण्याची शक्यता असते आणि स्ट्रोक होण्याचा धोका निर्माण होतो.
सेरेब्रल व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?
या अवस्थेत मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी (blood clots) तयार होतात. या गाठी नसांमध्ये अडकतात आणि रक्तप्रवाह थांबवतात. यामुळे नसांमध्ये दाब वाढतो, सूज येते आणि गंभीर परिणाम उद्भवू शकतात. डॉक्टर या स्थितीला Cerebral Vein Thrombosis (CVT) असं म्हणतात. वेळेत लक्ष न दिल्यास याचा परिणाम कायमस्वरूपी अपंगत्व, स्मृती कमकुवत होणे किंवा मृत्यू देखील ठरू शकतो.
मेंदूमधील नसा ब्लॉक होण्यापुर्वी आपल्याया काही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. नाही तर ते जीवावर देखील बेतू शकते. मेंदू मध्ये नक्की कोणकोणते अडथळे निर्माण होतात. हे जाणून घेऊयात .
1. अचानक आणि तीव्र डोकेदुखी: डोकेदुखी सामान्य असू शकते, पण जर ही दुखणं अचानक सुरू झाली आणि ती खूप तीव्र असेल, विशेषतः हे दुखणं आधी कधी अनुभवली नसेल, तर डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे.
2. अर्ध्या शरीरात अशक्तपणा किंवा मुकपणा: चेहऱ्याचा एक भाग, एक हात किंवा एक पाय अचानक कमकुवत वाटू लागणे किंवा मुका पडणे. हे देखील एक लक्षण आहे.
3. बोलण्यास त्रास होणे: वाक्य बनवण्यात अडचण, शब्द चुकीचे उच्चारले जाणे किंवा अगदी बोलणं अशक्य होणं.
4. दृष्टीत बदल होणे: एका डोळ्याने किंवा दोन्ही डोळ्यांनी धुसर किंवा अस्पष्ट दिसणे, डोळ्यांसमोर अंधुक छटा दिसणे.
5. चक्कर येणे आणि असंतुलित वाटणे: चालताना समतोल बिघडणे, कोणत्याही दिशेला झुकत जाणे किंवा अचानक पडणे.
6. अत्यधिक थकवा आणि अशक्तपणा: शरीरात उर्जा नसल्यासारखं वाटणे, सामान्य काम करण्यासही त्रास होणे.
7. स्मृती कमी होणे किंवा गोंधळलेपणाची भावना: नुकत्याच घडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, प्रश्नांना उत्तर देता न येणे, किंवा मनात गोंधळ निर्माण होणे.
8. शरीरातील विशिष्ट भागात मुंग्या येणे किंवा संवेदना कमी होणे: पाय, हात, बोटं किंवा चेहऱ्यावर शून्यता वाटणे, संवेदना जाणवू न शकणे.
9. चेहरा वळणे: हसताना एक बाजू न हलणे, तोंडाची रचना बदलणे, डोळा किंवा ओठ नीट न हलणे.
10. हालचालीत समन्वयाचा अभाव: बारीक हालचाली करताना अडथळा येणे. उदा. बटण लावणे, चमच्याने खाणे, लिहिणं.
ही लक्षणं शरीरात जाणवू लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. याकडे दुर्लक्ष केल्यास याचा त्रास जीवावर बेतू शकतो. त्यामुळे त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.







