
नेमकं काय घडलं?
या सापाचा व्हिडीओ शेअर करताना वीर दासने लिहिले की, ‘आम्ही इथे जवळच शूटिंग करत होतो. त्यामुळे रात्री एका इको रिसॉर्टमध्ये थांबण्याचं ठरवलं. मला टॉयलेटला जायचे होते, म्हणून मी बाथरूमचा दरवाजा उघडला, आणि कमोडजवळ उभा राहिलो, माझा कार्यभाग उरकला आणि फ्लश सुरू करण्यापूर्वीच… एक साप छतावरून थेट फ्लश हँडलजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर पडला. आता मी पुन्हा हे टॉयलेट अजिबात वापरणार नाहीये.’ अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






