
‘शहरी उदासीनतेबद्दल आम्हाला खरोखरच चिंता आहे. हा ट्रेंड चांगला नाही. शहरी भागातील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, असं आवाहनही राजीव कुमार यांनी केलं. गुडगाव, फरिदाबाद, ज्युबिली हिल्स, हैदराबाद, बेंगळुरू दक्षिण, गांधीनगर, कुलाबा, पुणे, ठाणे… या सगळ्या ठिकाणचं मतदान त्या-त्या राज्यांतील सरासरी मतदानापेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६४ पैकी ६२ शहरी विधानसभा मतदारसंघांत राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालं होतं. तोच ट्रेंड लोकसभेतही दिसला. त्यामुळं आता शहरी भागासाठी विशेष मोहीम राबविली जाईल,’ असं राजीव कुमार म्हणाले.




