
ghaziabad fiance rape : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. कोलकाता, बदलापूर येथील घटना ताजी असतांना आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीचा साखरपुडा झाला. ती होणाऱ्या नवऱ्यासोबत ऋषिकेश येथे फिरायला गेली असता, त्याने हॉटेल रूममध्ये तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिच्या अंगावर आठ ठिकाणी चावला व तिला गंभीर मारहाण केली. यानंतर त्याने त्यांच्या मित्रांना देखील फोन करून बोलावून घेतलं. त्याच्या मित्रांनीही तरुणीवर अत्याचार केला.