
Maratha Reservation- २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान केल्या जात असलेल्या मराठा व ओपन वर्गाच्या सर्वेक्षणाची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्य मागास आयोगाने सर्वेक्षणाची मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे. राज्यात राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची मुदत ३१ जानेवारी होती, पण आता यासाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.







