‘राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं; फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर…’ संजय राऊतांचा टोला

0
15
‘राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं; फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर…’  संजय राऊतांचा टोला


Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे म्हणाले होते की, मनसे सरकारमध्ये सहभागी असेल व भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट करत फडणवीसांचे अभिनंदन केले व या सरकारच्या निर्णयांना आपला पाठिंबा असेल असंही सांगितलं आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये राज ठाकरेंना महायुतीत सहभागी करुन घेण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये राज ठाकरेंना टोला लगावला आहे.



Source link