
अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या नावावरून चिन्मय आणि त्याच्या कुटुंबियांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कुटुंबाला मानसिक त्रास नको, म्हणून हा निर्णय चिन्मय मांडलेकरने घेतला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या वेगळ्याच कारणामुळे प्रचंड ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका पॉडकास्टला एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान त्याच्या मुलाचा नावाचा विषय निघाला होता. चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचे नाव‘जहांगीर’ आहे. यावरून अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल केले गेले.







