
९० च्या दशकात, २ मराठी पोरं पोरींनी न्यूड फोटोशूट केलं आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. ९० चे दशक हे बदलाचं होत. चित्रपट टेलिव्हिजन, म्युजिक, जाहिराती, मीडिया अशा सर्व क्षेत्रामध्ये नवनवीन आणि बोल्ड असे प्रयोग अगदी बिनधास्त पणे केले जात होते. आजच्या सोशल मीडिया आणि OTT च्या काळात न्यूडीटी हाविषय जरी नॉर्मलाईज झाला असला तरी ९०च्या काळात बोल्ड कपडे घालणं हा देखील वादाचा विषय ठरायचा. मात्र या बोल्डनेस भारतात, बोल्ड मॉडेलिंगची संस्कृती रुजू केली होती. सर्वत्र मॉडलिंगचे वारे वाहू लागली होते. टीव्ही चॅनेल्स आणि प्रिंट मिडियामध्ये जाहिरातींचा वेग वाढला होता. त्यामुळे मॉडेल्सना जाहिरातींमध्ये जागा मिळत होती. यादरम्यान अशीच एक जाहिरात वादग्रस्त ठरली ती म्हणजे मराठमोळे मॉडेल मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांची एक प्रिंट जाहिरात.