‘मुलीला नदीत फेकून देईन’च्या धमकीनंतरही धर्मरावबाबा आत्रामांची मुलगी ‘या’ तारखेला शरद पवार गटात प्रवेश करणार!

0
17
‘मुलीला नदीत फेकून देईन’च्या धमकीनंतरही धर्मरावबाबा आत्रामांची मुलगी ‘या’ तारखेला शरद पवार गटात प्रवेश करणार!


अजित पवार गटाचेमंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांची मुलगी भाग्यश्री हलगीकर लवकरच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र जी मुलगी बापाची झाली नाही, ती तुमच्या पक्षाची कशी होईल, असा टोला आत्राम यांनी शरद पवार यांच्या पक्षाला लगावला होता. तसेच मुलगी दर माझ्या विरोधात गेली तर तिला नदीत फेकून देईन, अशीधमकीही आत्राम यांनी दिली होती. या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्राम हलगीकर या शरद पवार गटात प्रवेश करण्याची तारीख नक्की झाली आहे.



Source link