
मुक्ता तुरुंगात असते
कोळी कुटुंबिय चित्रपट पाहून घरी येतात तरीही मुक्ता घरी आलेली नसते. त्यामुळे सर्वजण चिंता व्यक्त करत असतात. तेवढ्यात अचानक सागर येतो आणि सगळ्यांना जागे पाहातो. तो विचारतो काय झाले तेव्हा मुक्ता घरी नसल्याचे कळते. त्यानंतर सागर मुक्ताला शोधण्यासाठी बाहेर पडतो. पोलिसात तक्रार करण्यासाठी सागर जातो. तेवढ्यात तेथे त्याला मुक्ता लॉकअपमध्ये असल्याचे दिसते. तो मुक्ताला धीर देतो आणि वकीलांकडून जामीन मिळवून घेतो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे सागर बोलतो.






