
बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक
“रुळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीची कामे करण्यासाठी बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे,” असे पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्लॉक कालावधीत बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर धावतील.







