माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा शम्मी कपूरनी पंचमदांच्या संगीत दिग्दर्शनात काम करणे नाकारले होते…

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जेव्हा शम्मी कपूरनी पंचमदांच्या संगीत दिग्दर्शनात काम करणे नाकारले होते…


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

‘तीसरी मंज़िल’मधील एका दृश्यात शम्मी कपूर आणि आशा पारेख. या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन पंचमदांनी केले होते.

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज प्रसिद्ध, सुपरहिट, ऑल टाइम क्लासिक चित्रपट ‘तीसरी मंज़िल’चा किस्सा सांगणार आहे. हा किस्सा मला खुद्द शम्मी कपूर यांनीच ऐकवला होता. शम्मी कपूर साहेबांनी सांगितले होते की, हा चित्रपट आधी देवआनंद करणार होते.

नासिर हुसेन चित्रपटाचे निर्माते आणि विजय आनंद दिग्दर्शक होते. सगळी तयारी झाली होती. सेटही लावला होता आणि शूटिंगच्या जेमतेम दोन दिवस आधी देव आनंद साहेबांनी नासिर हुसेन यांना पत्र पाठवले. तो काळ पत्रांचाच होता. त्यांनी लिहिले होते की, मी काही वैयक्तिक कारणांमुळे हा चित्रपट करू शकणार नाही, तुम्ही त्याचे शेड्यूल रद्द करा. आपण भेटून बोलू आणि हे कसे करायचेे, याबद्दल पुढचे नियोजन करू.

नासिर साहेबांना याचं खूप वाईट वाटलं. पण, ते काहीच करू शकत नव्हते‌. त्याच रात्री ते एका पार्टीला गेले होते. तिथेे त्यांची शम्मीजींसोबत भेट झाली. ते शम्मीजींना कितीतरी दिवसांनी भेटत होते. शम्मी कपूर यांच्यासोबत नासिर साहेबांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. म्हणजे त्यांनी आपल्या किरकिर्दीची सुरूवातच शम्मीजींसोबत केली होती. तो चित्रपट होता ‘दिल दे के देखो’. त्यानंतर या दोघांनी सोबत काम केले नव्हते. दोघे त्या पार्टीत भेटले, तेव्हा शम्मी साहेब म्हणाले, ‘अरे, काय झाले नासिर साहेब! मी तुमचा पहिला चित्रपट केला, तेव्हा शूटिंगच्या वेळी तुम्हाला कधीच त्रास दिला नाही. आपली इतकी चांगली मैत्री आहे, तरीही तुम्ही माझ्यासोबत पुन्हा काम केले नाही.’ नासिर साहेब म्हणाले, ‘चला, एक सिनेमा करूया. पण, एक अट आहे.’ शम्मी कपूर यांनी ‘काय?’ असे विचारले, त्यावर ते गंमतीच्या स्वरात म्हणाले की, तुला उद्यापासूनच शूटिंग करावे लागेल. मग शम्मीजींनीही त्याच स्टाइलने उत्तर दिले, “उद्यापासून नाही, तर परवापासून. उद्या मी तुमच्यासोबत बसून कथानक आणि पोशाखाबाबत समजून घेईन आणि कपडे नसतील तर मी माझ्याकडे घालून येईन. पण, इतर गोष्टींबद्दल बोलणे जास्त महत्त्वाचे आहे.’ नासिर साहेबांनी त्या गोष्टीला होकार दिला.

दुसऱ्या दिवशी ते भेटले तेव्हा शम्मीजी म्हणाले की, मला कशाचीही चिंता नाही. कारण तुम्ही निर्माते आहात, स्क्रिप्टही तुम्हीच लिहिली आहे. त्यामुळे ती उत्कृष्ट असेल, याची मला खात्री आहे. आणि मी गोल्डींचे (विजय आनंद) ‘नौ दो ग्यारह’, ‘काला बाजार’, ‘तेरे घर के सामने’, ‘गाइड’ हे चारही सिनेमे पाहिले आहेत. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे की, सिनेमात एक गोष्ट मला माझ्या आवडीची हवी असते आणि ती म्हणजे संगीत.’ त्यावर नासिर साहेब म्हणाले की, आम्ही संगीत दिग्दर्शकाला तर आधीच करारबद्ध केले आहे आणि ते बरेच दिवसांपासून संगीतावर कामही करत आहोत. शम्मीजींनी ‘कोण?’ असं िवचारल्यावर ते म्हणाले, ‘पंचम’, हा एस. डी. बर्मन यांचा मुलगा आर. डी. बर्मन आहे.’ त्यावेळेपर्यंत आर. डी. बर्मन यांनी दोन चित्रपट केले होते. ते त्यांना मेहमूद साहेबांमुळे मिळाले होते. ‘छोटे नवाब’ आणि ‘पती-पत्नी’ हे ते दाेन सिनेमे होते. शम्मी साहेब त्यांना म्हणाले, ‘मला माहीत आहे. पण, माझे आवडते संगीतकार शंकर-जयकिशन आहेत.’ तेव्हा नासिर साहेब म्हणाले की, आम्ही पंचमसोबत संगीतावर काम करतोय. त्याने खूप मेहनत घेतलीय. तो खूप हुशार आहे आणि मजरूह साहेबांनीही त्याची शिफारस केलीय. हवं असल्यास मजरूह साहेबांना तुम्ही विचारू शकता.

संगीताच्या बाबतीत मजरूह साहेबांच्या नावाला बरेच वजन होते. त्यांची संगीताची जाण सर्वोत्कृष्ट होती. नासिर साहेबांनी शम्मीजींना, आम्ही बरीच गाणी तयारही केली आहेत, असे सांगितले. पण, त्यांनी ऐकले नाही. तेव्हा नासिर साहेब म्हणाले, “तुम्ही एकदा ही गाणी ऐका. ती तुम्हाला आवडली नाहीत, तर मी तुमच्या आवडीचा संगीत दिग्दर्शक घेईन. पण, मला खात्री आहे, तुम्हाला ती आवडतील.’ मग आपल्याला ही गाणी आवडणार नाहीत, असं गृहीत धरुनच शम्मीजी ती ऐकायला बसले. पण, त्यांनी जेव्हा गाणी ऐकली; पहिलं गाणं, दुसरंं, मग तिसरं.. ही गाणी ऐकल्यावर ते उत्साहात उभे राहिले आणि नासिर साहेबांना म्हणाले, ‘डन! आता मी तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही. या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक पंचमच असेल.’ यावरून मला अहमद फ़राज यांचा एक शेर आठवतोय…

गुफ़्तगू अच्छी लगी

ज़ौक़-ए-नज़र अच्छा लगा

मुद्दतों के बाद कोई

हम-सफ़र अच्छा लगा।

शम्मीजींनी ऐकलेली ती गाणी म्हणजे.. ‘ओ मेरे सोना रे’, ‘ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली’ आणि ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा..’ हा आर. डी. बर्मन यांचा पहिला व्यावसायिक सुपरहिट चित्रपट होता. त्यानंतर त्यांंनी आपल्या संगीताने, त्याच्या संयोजनाने, चालींनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आणि ते एक अजरामर, दिग्गज संगीत दिग्दर्शक बनले. त्यांचे संगीत, नासिर हुसेन यांची निर्मिती, विजय आनंद यांचे दिग्दर्शन आणि शम्मी कपूर यांच्या अभिनयाने ‘तीसरी मंज़िल’ हा संस्मरणीय चित्रपट ठरला. या सिनेमाच्या आठवणीत त्यातीलच हे एक गाणे ऐका…

तुमने मुझे देखा होकर मेहरबान

_रुक गई यह ज़मीन, थम गया आसमान।_

स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link