
ब्रिटीश महिला क्लो लोपेझने व्हिडिओसाठी केलेल्या एका कृतीमुळे अनेकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला आहे. तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. लोपेझने अंडरवेअर काढून सुपरमार्केटमधील फूड ट्रेवर ठेवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोपेझला तिच्या निष्काळजीपणाबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांनी फटकारले आहे.