महायुतीला तडा! महादेव जानकर यांनी सोडली शिंदे, फडणवीस व अजित पवारांची साथ

0
16
महायुतीला तडा! महादेव जानकर यांनी सोडली शिंदे, फडणवीस व अजित पवारांची साथ


महायुतीला फटका बसणार?

सोलापूर, अहिल्यानगर, बारामती, इंदापूर, कर्जत-जामखेड, मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना अशा जिल्ह्यांत जानकर यांच्या रासपचा चांगला प्रभाव आहे. मराठा, ओबीसी, आदिवासींच्या आरक्षण प्रश्नामुळं राज्यात सध्या सामाजिक तणाव आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद राज्याच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी धनगर समाजाचा चेहरा दूर जाणं महायुतीला परवडणारं नाही. रासप स्वतंत्र लढल्यास महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.



Source link