मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीसरशी संपवतो; संभाजीराजेंच्या विधानाने चर्चांना उधाण

0
22
मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीसरशी संपवतो; संभाजीराजेंच्या विधानाने चर्चांना उधाण


सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावे, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक सहभागी झाले आहेत.छत्रपती संभाजीराजेंनी सरसकट फेलोशिप प्रश्नी लक्ष घालावे आणि प्रश्न मिटवावा त्यानंतरच आम्ही आमचं आंदोलन थांबवतो, अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी केली. त्यावर बोलताना संभाजीराजे यांनी ‘मला मुख्यमंत्री करा मी तुमचे सर्व प्रश्न मिटवतो’असं विधान केलं. हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.



Source link