मणिपूरसाठी धोक्याची घंटा! म्यानमारमधून घुसले ९०० दहशतवादी, गुप्तचर विभागाचा धक्कादायक अहवाल, चिंता वाढली

0
15
मणिपूरसाठी धोक्याची घंटा! म्यानमारमधून घुसले ९०० दहशतवादी, गुप्तचर विभागाचा धक्कादायक अहवाल, चिंता वाढली


Manipur news : हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमार मधील दहशत वाद्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार म्यानमारमधून सुमारे ९०० दहशतवादी मणिपूरमध्ये दाखल झाले असून ते मोठा घातपात घडवण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, कुकी दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. म्यानमारला लागून असलेल्या डोंगराळ भागात विशेष सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या भागात कुकीचे समाजाचे वर्चस्व आहे.



Source link