
डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या जमिनीवर आणि हॉलमध्ये सर्जरी केल्या आहेत. बहुतेक सर्जरी ॲनेस्थिशिया न देता करण्यात आल्या. आम्हाला उपकरणं, औषध, बेड, एनेस्थिसीया आणि इतर गोष्टींची गरज आहे असं अबू सेल्मिया म्हणाले. रुग्णालयातील जनरेटरचे इंधन काही तासांत संपेल, त्यानंतर रुग्णालयातील काम ठप्प होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.








