भिंत कोसळून ७ मजुरांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेल्याची भीती, बचावकार्य सुरू

0
4
भिंत कोसळून ७ मजुरांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेल्याची भीती, बचावकार्य सुरू


गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. कडी तालुक्यातील जसलपूर गावाजवळ एका कंपनीची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. अजूनही चार ते पाच कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, येथे एका कारखान्यासाठी भूमिगत टाकी बसविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक भिंत कोसळली आणि घटनास्थळी काम करणारे कामगार अडकले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिका आणि पोलिसांची पथकेही घटनास्थळी दाखल आहे आहे.



Source link