‘ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही’! किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत; काय म्हणाले वाचाच…

0
1
‘ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही’! किरण माने यांची नवी पोस्ट चर्चेत; काय म्हणाले वाचाच…


आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय!

‘धर्मोपदेश’ करून अडाणी कष्टकरी जनतेला भुलवणार्‍या पाखंडी बुवाबापूंचे बुरखे फाडताना ते म्हणतात, “धर्म उपदेशी मागेल जो अर्धी । तयाचिया प्रीती भजू नये ।। थाटमाट करुनि लुबाडीत रांडा । ऐसिया पाखंडा भुलू नये ।।” एक लक्षात घ्या, हे विचार सेना महाराजांनी मांडलेत तब्बल आठशे वर्षांपुर्वी! त्याकाळात बहुजनांना, “उपास तापास नका करू व्रत । राहा धरुनी चित्त हरी पायी ।।” असा साधासोपा धर्म शिकवणं म्हणजे खायचं काम नव्हतं राजेहो. विशेष म्हणजे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत सेनांच्या एका अभंगाचा समावेश आहे. “जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ।। तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ।। सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ।। सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ।।” कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्‍या सेना महाराजांना त्रिवार वंदन’, असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली आहे.



Source link