
Buldana Bus Fire: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ बसला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली. टायर फुटल्याने बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहे. जखमींवर बुलढाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपघाताला जबाबदार धरले आहे. राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.







