बांगलादेश लष्कराच्या मुठीत! पंतप्रधानांच्या घरात तोडफोड, आंदोलक घुसले! चिकन, मासे, फर्निचर पळवले

0
17
बांगलादेश लष्कराच्या मुठीत! पंतप्रधानांच्या घरात तोडफोड, आंदोलक घुसले! चिकन, मासे, फर्निचर पळवले


परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहून शेख हसीना यांनी राजीनामा देत घर सोडलं. त्यानंतर आंदोलकांनी घराचा ताबा घेतला. तिथं तोडफोड केली. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान यांच्या पुतळ्याचीही आंदोलकांनी तोडफोड केली. पंतप्रधान निवासाच्या आवारातही आंदोलकांनी तोडफोड केली. हसीना पळाल्याचं समजल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी ढाक्यात उभ्या असलेल्या टाकीवर काही आंदोलक नाचत होते व झेंडे फडकावत होते. आंदोलकांनी हसीना यांच्या निवासस्थानी घातलेल्या धिंगाण्याचे व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. 



Source link