बदलापूर प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सर्व राज्यातील शाळांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना जारी!

0
15
बदलापूर प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सर्व राज्यातील शाळांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचना जारी!


बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली लागू केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडूनही देशातील सर्व राज्यातील व केंद्र शासित प्रदेशांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना’ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.



Source link