
कसा होता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचा अनुभव?
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बद्दल बोलत असताना, राज अनादकत याने मालिकेतील त्याचा प्रवास एक अद्भुत अनुभव असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, ‘जर मला माझ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील प्रवासाचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर मी त्याला ‘वंडरफुल’, ‘माइंडब्लोइंग’ आणि ‘अमेझिंग’ असे म्हणेन. या शोमधून मला खूप काही शिकायला मिळाले. अनेक चढउतार आले. आम्ही हसलो, रडलो आणि खूप मजा केली. माझी पहिली परदेशवारीही याच शोमुळे झाली. या मालिकेच्या शूटिंगसाठी आम्ही सिंगापूरला गेलो होतो.’