
‘बीएपी युनियन’ जहाजाचे कमांडिंग ऑफिसर यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘गौरव स्तंभा’वर जाऊन पुष्पहार अर्पण केले. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिली. पश्चिम नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ऑपरेशन्स) रिअर एडमिरल कुणाल सिंग राजकुमार यांचीही भेट घेतली. यावेळी उभयंतांमध्ये परस्पर हितसंबंध, नौदल प्रशिक्षण आणि दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य वाढविण्याच्या मुद्दांवर चर्चा झाली.






