
दरम्यान, परिणिती चोप्राच्या जवळच्या सुत्रांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेग्नंसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. ‘प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. ती गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त आणि खासगी कामानिमित्त इकडून तिकडे प्रवास करत आहे. खरं तर, एखाद्याच्या पोशाखाच्या निवडीमुळे या चर्चा सुरु होतात आणि त्यामुळे खासगी आयुष्यात घुसखोरी होऊ शकते हे धक्कादायक आहे’ अशी माहिती सुत्रांनी दिली.








