पत्रकारांचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन; पत्रकार संरक्षण कायदयाची करणार होळी

0
14
पत्रकारांचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन; पत्रकार संरक्षण कायदयाची करणार होळी


पाचोऱ्याची घटना घडल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्हीजेए, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल चिंता व्यक्त केली होती. पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत १७ ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्याचे आंदोलन होत असून राज्यातील पत्रकारांनी संघटनी संघटनात्मक भेद न बाळगता उद्याच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन वरील ११ संघटनांनी केले आहे.



Source link