- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Marriage Ceremony Becomes An Event, Make It A Place Of Prayer
15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एकेकाळी आपल्या देशाला राजकीय एकतेची नितांत आवश्यकता होती. सरदार पटेल यांनी ती पूर्ण केली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो. पण आता कुटुंब एकता दिन साजरा करण्याची वेळ आली आहे. भारतीय कुटुंबे तुटत आहेत. लग्नाचे स्वरूप बदलत आहे. मुळात विवाह टिकून राहिले तर घटस्फोट संपतील. आता नवीन समस्या उद्भवली आहे. कारण तरुण पिढी लग्न करू इच्छित नाही.
लग्न हा एक बंधन विधी असतो, ज्यात वरवधूच्या वस्त्रांची गाठ बांधली जाते, जेणेकरून ते एक राहतील. पण आता हे बंधन रेशमी धाग्यापेक्षा कमकुवत आहे. आजच्या तरुण पिढीला शिकवले पाहिजे की ते ज्या कुणाला आदर्श व्यक्ती मानतात त्यांनी लग्न कसे केले आणि कुटुंब कसे एकत्र टिकवले याचा विचार करावा.
कारण विवाह संस्था कमकुवत झाली तर भारतातील कुटुंब व्यवस्था टिकवणे कठीण होईल. विवाह सोहळा इव्हेंट किंवा उद्योग बनत आहे, त्याऐवजी त्याला पूजास्थळ, संस्कार किंवा उपासना बनवले पाहिजे.







