नवविवाहित जोडप्यांनी १६-१६ मुले जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या!

0
1
नवविवाहित जोडप्यांनी १६-१६ मुले जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या!


चेन्नई येथे हिंदू धार्मिक आणि एंडॉवमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टालिन यांनी हे वक्तव्य केले, जिथे मुख्यमंत्री स्टालिन यांच्या उपस्थितीत ३१ जोडप्यांनी लग्न केले. यावेळी स्टालिन म्हणाले की, ‘पूर्वीचे लोक नवविवाहित जोडप्यांना १६ प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आशीर्वाद द्यायचे. परंतु, आता १६ प्रकारची संपत्ती मिळण्याचा आशीर्वादाऐवजी १६ मुले जन्माला घालण्याचा आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे. पूर्वी सांगण्यात येणारी १६ संपत्ती म्हणजे गाय, घर, पत्नी, संतान, शिक्षा, जिज्ञासा, ज्ञान, अनुशासन, भूमी, जल, आयु, वाहन, सोना, संपत्ती, धान्य आणि प्रशंसा होती. याचे रुपांतर आता शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, शिस्त, जमीन, पाणी, वय, वाहन, सोने, संपत्ती, पीक आणि स्तुती या स्वरूपात करण्यात आले. पण आता १६ प्रकारची संपत्ती मिळविण्यासाठी कोणीही आशीर्वाद देत नाही. त्याऐवजी, फक्त मुले होण्याचा आणि समृद्ध जीवन जगण्याचा आशीर्वाद देत आहेत.’



Source link