दिलासादायक ! | जानेवारी महिन्यात घटली घाऊक महागाई; महागाईचा दर झाला कमी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
दिलासादायक ! | जानेवारी महिन्यात घटली घाऊक महागाई; महागाईचा दर झाला कमी | Navarashtra (नवराष्ट्र)


जानेवारी महिन्यात घटली घाऊक महागाई; महागाईचा दर झाला कमी

देशातील घाऊक महागाईचे आकडे दिलासा देणारे ठरले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर कमी झाला आहे. घाऊक महागाईचा दर जानेवारी 2024 मध्ये 0.27 टक्क्यांवर आला आहे.

नवी दिल्ली : देशातील घाऊक महागाईचे आकडे दिलासा देणारे ठरले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर कमी झाला आहे. घाऊक महागाईचा दर जानेवारी 2024 मध्ये 0.27 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये तो 0.73 टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने महागाई कमी झाली आहे.

जानेवारीमध्ये किरकोळ महागाई आणि घाऊक महागाई या दोन्हींमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये किरकोळ महागाई डिसेंबरच्या घाऊक महागाईत दीर्घकाळ वाढ झाल्यामुळे बहुतांश उत्पादक क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होतो. घाऊक किमती जास्त काळ चढ्या राहिल्यास उत्पादक त्याचा भार ग्राहकांवर टाकतात. सरकार केवळ कराद्वारेच घाऊक महागाई नियंत्रित करू शकते.






Source link