पं. विजयशंकर मेहता21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपली चेतना एकटी असते, तेव्हा ध्यान लागते. पण चेतना मायेच्यासंपर्कात आली, तर आपण गुंतून जातो. रामकथेत पक्षीराज गरुड असेचगुंतले होते. युद्धाच्या वेळी त्यांनी श्रीरामांचे बंधन तोडले आणि वाटले कीमी मोठे काम केले. पण त्यानंतर ते अस्वस्थ झाले. तेव्हा ते देवर्षी नारदांकडेगेले आणि आपला संशय व्यक्त केला – “ब्याकुल गयउ देवरिषि पाहीं।कहेसि जो संसय निज मन माहीं।।” नारदांनी सांगितले – गरुडा, श्रीरामांचीमाया फार प्रबळ आहे. मलाही या मायेनं अनेकदा नाचवलं आहे. सावधव्हा आणि ब्रह्माजींकडे जा. या प्रसंगातून संदेश मिळतो की आपणसंसारात राहतो, तेव्हा कुठे ना कुठे गुंतागुंत नक्कीच निर्माण होते. त्यातूनसुटण्याचा उपाय म्हणजे संतांचा सहवास, सत्संग आणि गुरूंचे मार्गदर्शन.सध्या पितृ पक्ष पंधरवाडा सुरू आहे. ध्यान करण्याचा आणखी एक सुंदरउपाय म्हणजे पूर्वजांचे स्मरण करणे. त्यांच्या निमित्ताने शुभकार्य केल्यासमन एकाग्र होते आणि आपण ध्यानाच्या मार्गावर चालू लागतो.
- humarehanuman@gmail.com
- Facebook:Pt. Vijayshankar Mehta







