जितेंद्र, हसन यांनी नाकारला होता ‘चालबाज’: 24 फेब्रुवारीला होती श्रीदेवीची पुण्यतिथी, त्यांचा ‘चालबाज’ ठरला होता सुपरहिट सिनेमा

0
17
जितेंद्र, हसन यांनी नाकारला होता ‘चालबाज’:  24 फेब्रुवारीला होती श्रीदेवीची पुण्यतिथी, त्यांचा ‘चालबाज’ ठरला होता सुपरहिट सिनेमा


रूमी जाफरी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यांना मी भाभीजी म्हणायचो, त्या श्रीदेवीजींची २४ फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्या दिवशी आम्हाला त्यांच्यासोबत व्यतित केलेला काळ आठवत होता. त्यांच्या संस्मरणीय सिनेमांपैकी एक म्हणजे ‘चालबाज’. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये या सिनेमाविषयी…

‘चालबाज’चे दिग्दर्शक पंकज पराशर माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत कामही केले आहे. या सिनेमाच्या प्लॅनिंगविषयी त्यांना विचारले. ते म्हणाले की, माझा ‘जलवा’ सिनेमा पाहून एल. व्ही. प्रसाद यांनी दक्षिणेतील दिग्गज निर्माते ए. पूर्णचंद्र राव यांना सांगितले, तुम्ही याला घेऊन सिनेमा बनवा, हा खूप मोठा दिग्दर्शक होईल. मग राव यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. त्यांच्याकडे निघाल्यावर मनात विचार घोळत होता.. आपण त्यांना सांगावे की, तुम्ही अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘अंधा कानून’, ‘आखिरी रास्ता’ असे दोन्ही सुपरहिट सिनेमे बनवले आहेत. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे प्लीज अमिताभ बच्चन यांना आणा, मी तुम्हाला एक सुपरहिट सिनेमा देतो.. त्यांच्या ऑफिसात शिरताच मला श्रीदेवीच्या कोणत्या तरी दाक्षिणात्य सिनेमाचे पोस्टर लावलेले दिसले.

हे पोस्टर पाहिल्यावर माझा विचार बदलला. मी पूर्णचंद्र रावांना विचारले, तुम्ही श्रीदेवीला ओळखता? ते म्हणाले की, माझे श्रीदेवीशी कौटुंबिक संबंध आहेत. मी तिच्याशी बोलेन, पण विषय काय आहे? मी तर अमिताभ बच्चन यांचा विचार डोक्यात ठेऊन गेलो होतो. पण, अचानक ‘सीता और गीता’ असे मी बोलून गेलो. पूर्णचंद्र रावांनी लगेच ‘ठीक आहे’ म्हणत साइनिंग अमाउंट म्हणून ११ हजार रुपयांचा चेक मला दिला आणि म्हणाले, पप्पी सध्या अमेरिकेत आहे, पण उद्या दुपारपर्यंत मी तुम्हाला तिच्या तारखा मिळवून देईन. आणि खरोखरच त्यांनी दुसऱ्या दिवशी मला श्रीदेवीच्या तारखा कळवल्याही. श्रीदेवीचे पूर्णचंद्र रावांशी किती जवळचे नाते असेल बघा, त्यांनी कथानक न ऐकताच केवळ ‘सीता और गीता’ एवढ्या नावावरच तारखाही मिळवून दिल्या. त्यानंतर पूर्णचंद्र रावांनी सांगितले की, तुम्ही लगेच पटकथा लिहायला सुरूवात करा. मी विचारले, सर, हीरो कोण घ्यायचे? ते म्हणाले, धर्मेंद्रने केलेल्या भूमिकेसाठी रजनीकांतला आणि संजीवकुमारच्या भूमिकेसाठी जितेंद्रला घेऊ. दोघांशीही माझे घनिष्ट संबंध आहेत, तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. मग त्यांनी जीतूजींची अपॉइंटमेंट घेतली आणि मी जाऊन त्यांना कथानक ऐकवले. जितूजींना त्यात मजा वाटली नाही. ते मला म्हणाले, पंकज, तू ‘करमचंद’सारखा स्टायलिश शो बनवला, ‘जलवा’सारखा जबरदस्त सिनेमा तयार केला, मग रमेश सिप्पीच्या सिमेनाचा रिमेक का करतोयस? आपल्या शैलीतले काही ओरिजनल बनव.

ही गोष्ट पूर्णचंद्र रावांना सांगितल्यावर ते म्हणाले, आपण दुसऱ्या कुणाला तरी घेऊ. तुम्हाला ‘सीता और गीता’ बनवायचाय ना, तुम्ही त्यावरच काम करा. मग मी ‘सीता और गीता’पेक्षा ही कथा कशी वेगळी करता येईल, हे डोक्यात ठेऊनच ती लिहिली. मी परत आल्यावर राव मला म्हणाले की, मी कमल हसनसोबत अपॉइंटमेंट फिक्स केली आहे, तुम्ही त्यांना कथानक ऐकवा. मी कमल हसन यांना नॅरेशन दिले. त्यावर ते म्हणाले, तुम्ही ‘सीता और गीता’मध्ये का बदल केला? मी उत्तर दिले की, मला ‘सीता और गीता’ जसाच्या तसा बनवायचा नाहीय. हे एेकून कमल हसन म्हणाले की, तुम्ही हे चुकीचे करताय. ‘सीता और गीता’ बनवायचे ठरवलेय तर तेच बनवा. तुम्ही समजा शेक्सपिअरची कहाणी घेतली आणि म्हणालात की मी यावर सिनेमा बनवतोय, पण आता त्यातून शेक्सपिअर बदलतोय, तर सगळे बिघडून जाईल. तुमचे संवाद वेगळे असतील, व्यक्तिरेखा वेगळ्या असतील, शॉट डिव्हिजन वेगळे असेल, लोकेशन वेगळे असेल, तर सिनेमाही वेगळा वाटेलच. पण, ‘सीता और गीता’ची जी मूळकथा आहे, ती बदलू नका.

हे ऐकून मनात विचार आला की, मी पुन्हा ‘सीता और गीता’च बनवतोय असे वाटल्याने जितेंद्र यांनी नकार दिला आणि मी ‘सीता और गीता’ बदलतोय म्हणून कमल हसन नकार देत होते. असो. मी परत येऊन हे पूर्णचंद्र रावांना सांगितले. ते म्हणाले, अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या मनातील कल्पनेप्रमाणे ‘सीता और गीता’ लिहा, आपल्याला दुसरा हीरो मिळेल. मग ही भूमिका सनी देओलने केली. आणि त्यानंतर हा सिनेमा किती गाजला, हे सगळ्यांना माहीत आहे. ‘चालबाज’ हा श्रीदेवीच्या आणि माझ्याही आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय सिनेमांपैकी आहे… यावरुन मला शकील बदायुनी यांचा एक शेर आठवतोय… चाहिए ख़ुद पे यक़ीन-ए-कामिल हौसला किस का बढ़ाता है कोई।

मला पंकज यांनी सांगितले की, या सिनेमाची पहिली प्रिंट आली, तेव्हा मी रमेश सिप्पीजींना बोलावले आणि त्यांच्या पायाशी बसून त्याची पहिली ट्रायल पाहिली. सिनेमा संपल्यावर त्यांनी मला शाबासकी दिली. या गोष्टीवरुन मला जावेद साहेबांनी सांगितलेला एक किस्सा आठवतोय. त्यांनी सांगितले होते की, आम्ही सिप्पी फिल्ममध्ये काम करत होतो तेव्हा ‘राम और श्याम’ हा सिनेमा खूप हिट झाला होता. त्यावेळी सिप्पी फिल्मने असा विचार केला की, या सिनेमाप्रमाणेच दिलीपकुमार यांच्याऐवजी एखाद्या हीरोइनला घेऊन का सिनेमा बनवू नये? आणि मग हेमामालिनी यांना घेऊन ‘सीता और गीता’ बनवला, जो सुपरहिट झाला.

‘राम और श्याम’चे निर्माते होते बी. नागीरेड्डी. एकेदिवशी सिप्पी फिल्मच्या ऑफिसमध्ये नागीरेड्डीचींचा फोन आला की, मी मुंबईत आलो आहे आणि मला सिप्पी साहेबांना भेटायचेय. सिप्पी साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ दिली. पण, नागीरेड्डीजी येणार आहेत आणि आपण त्यांच्या ‘राम और श्याम’ची कॉपी करुन ‘सीता और गीता’ बनवलाय, त्याचा रिमेक केलाय. आता त्यांना सामोरे कसे जायचे, या विचाराने सिप्पींच्या ऑफिसात अस्वस्थता पसरली. ठरल्याप्रमाणे नागीरेड्डीजी आले, सिप्पी साहेबांसोबत चर्चा केली आणि निघून गेले. ते कशासाठी आले होते, असे सगळ्यांनी विचारल्यावर सिप्पी साहेबांनी सांगितले की, ते तमिळसाठी ‘सीता और गीता’च्या रिमेकचे राइट घेण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हणालो, सर, का आम्हाला लाजवताय? आम्हीच तुमच्या ‘राम और श्याम’ला मुलगी बनवून रीमेक केलाय. तर नागीरेड्डीजी म्हणाले की, हीरोने केलेल्या भूमिकांमध्ये मुलगी काम करेल, ही आयडिया तुमचीच होती ना! पैसे तर अशा आयडियाचे असतात. त्यामुळे तुमच्याकडून राइट घेतल्यावरच मी त्यावर दक्षिणेत सिनेमा बनवेन. नागीरेड्डी यांच्यासारख्यांची नैतिकता आणि चारित्र्य असे होते.

श्रीदेवीजींनी अंगात ताप असतानाही चित्रीत केलेले ‘चालबाज’चे हे गाणे आज त्यांच्या आठवणीत ऐका…

न जाने कहाँ से आयी है, न जाने कहाँ को जाएगी…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link