गोविंदाने आजवर संस्कृतीचे किती भान ठेवले?; कटू अनुभव शेअर करत मराठी निर्मात्याचा आरोपांचा भडीमार

0
16
गोविंदाने आजवर संस्कृतीचे किती भान ठेवले?; कटू अनुभव शेअर करत मराठी निर्मात्याचा आरोपांचा भडीमार


महेश टिळेकर यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘कला संस्कृतीसाठी काम करणार गोविंदा? खरं तरं त्याने पुन्हा राजकारणात येणं, एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करणं याला विरोध नाहीच. पण, राजकीय प्रवेश करताना जे कारण सांगितलं त्यानं की, कला संस्कृतीसाठी तो राजकारणात परत येत आहे, हे ऐकून याची अवस्था म्हणजे ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या’ अशी आहे. यशाच्या शिखरावर असताना जेव्हा गोविंदा स्टार होता, तेव्हा ही त्याला कला संस्कृतीसाठी काम नक्कीच करता आलं असतं. तेव्हा तर त्याचं नाव खूप होतं, पण तेव्हा हे असलं काही का सुचू नये त्याला? ज्या कला, संस्कृतीची भाषा हा आता करतोय, तेव्हा तो ज्या अभिनय क्षेत्रात काम करत होता, त्या कला क्षेत्रातील लोकांबरोबर (निर्माते, दिग्दर्शक, सह कलाकार) यांच्या बरोबर हा कसा वागला, किती माज दाखवला हे त्याने आठवून पहावं. त्याच्या बरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्याच्या शूटिंगला उशिरा येण्यानं, कधी कधी तर न येण्यानंही निर्माता दिग्दर्शक यांचं किती नुकसान झालं, याचा त्याने निदान आता उतरत्या काळात तरी विचार करावा.’



Source link