गादीऐवजी जमिनीवर झोपणं, भोजनाचा त्याग करून केवळ नारळ पाणी; राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे कठोर तप

0
17
गादीऐवजी जमिनीवर झोपणं, भोजनाचा त्याग करून केवळ नारळ पाणी; राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदींचे कठोर तप


Ayodhya Ram Mandir : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जवळपास ६ हजार लोक सामील होणार आहेत. राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या आधी पंतप्रधान मोदींनी कठोर तप करण्यास सुरूवात केली आहे. मोदी सध्यायम नियमांचे पालन करत आहे. ते ११ दिवसांच्याअनुष्ठानावर आहेत. यादरम्यान मोदी जमिनीवर झोपत आहेत व केवळ नारळ पाणी पिऊन आपले काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेपूर्वी कडक उपवास केला आहे.



Source link