गर्लफ्रेण्डने दिली Buisness Idea; शून्य गुंतवणुकीत पठ्ठ्याने कुंभमेळ्यात केली बक्कळ कमाई!

0
23
गर्लफ्रेण्डने दिली Buisness Idea; शून्य गुंतवणुकीत पठ्ठ्याने कुंभमेळ्यात केली बक्कळ कमाई!


Buisness Idea: व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल लागतं अशी ओरड आपण ऐकली असेल. पण व्यवसायासाठी मोठं भांडवल नव्हे तर एक आयडिया लागते हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवलंय.  प्रयागराजच्या कुंभमेळ्यात देशासह जगभरातून भाविक येत आहेत. येथे भाविकांची इतकी मोठी गर्दी आहे की तिथे व्यवसाय करणाऱ्यांची खूप चांगली कमाई होतेय. एका तरुणाला त्याच्या गर्लफ्रेण्डने महाकुंभ मेळ्यासाठी बिझनेस आयडिया दिली. यामुळे त्याने कमी दिवसात खूप मोठी कमाई केली. 

महाकुंभमेळ्यात चहा, चाट आणि पकोडे विक्रेतेही चांगले पैसे कमवत आहेत. अलिकडेच एका मुलाने त्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईबद्दल सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्या मुलाने फक्त दातांच्या काड्या विकून काही दिवसांत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आदर्श तिवारी (@adarshtiwari20244) या इन्स्टा हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ज्यामध्ये एक माणूस कुंभमेळ्यात दातांच्या काड्या विकताना दिसतोय. आपण कडुलिंबाचा टूथब्रश विकतोय. याला खूप चंगला प्रतिसाद मिळत असून लोक मोठ्या प्रमाणात कडुलिंबाच्या काड्या विकत घेतायत. त्यामुळे काही दिवसांत मी 30 ते 40 हजार रुपये कमावल्याचे तो व्हिडीओमध्ये सांगतोय. कधीकधी ही कमाई एका दिवसात 5 ते 6 हजार रुपये इतकी होते. तर कधीकधी कमाई 10 हजारांपर्यंतही जाते. तुम्ही जितकी जास्त मेहनत घ्याल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील, असेही तो पुढे सांगतात.

कुंभमेळ्यात एका माणसाने दातांसाठी कडुलिंबाच्या काड्या विकायला सुरुवात केली. आदर्शने त्या मुलाला विचारले की त्याला टूथस्टिक्स विकण्याची कल्पना कशी सुचली? असे विचारले. तेव्हा त्याने सांगितले की माझ्या मैत्रिणीने मला ही कल्पना सांगितले. या व्यवसायात कोणतीही गुंतवणूक नाही, टूथस्टिक्स मोफत मिळतात आणि शक्य तितके विकून पैसे कमवता येतात.माझ्या मैत्रिणीमुळेच मी इतके पैसे कमवू शकलोय, असेही तो पुढे सांगतो. 

व्हिडिओ व्हायरल 

या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले, ‘मग आमची वहिनी एक उत्तम अर्थतज्ज्ञ आहे!’ दुसरा यूजर म्हणतो, ‘फक्त तिच्याशी लग्न कर, एक दिवस तुला सगळं मिळेल, गाडी, बंगला इ.’ आणखी एका युजरने म्हटले, ‘एवढ्या चांगल्या मैत्रिणीचा विश्वासघात करू नकोस!’ ‘त्या मुलाने त्याच्या मैत्रिणीचा उल्लेख केला तेव्हा तो लाजायला लागला!’ अशी कमेंटही एका युजरने केलीय.





Source link