गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाला चाकूने भोसकलं, तर पुण्यात गोळीबाराची घटना

0
18
गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच  कोल्हापुरात एकाला चाकूने भोसकलं, तर पुण्यात गोळीबाराची घटना


राज्यात गणेशविसर्जनाची धूम असून मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला जाता आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहारांमध्ये रात्री उशिरापर्यंत विसर्जना मिरवणुका सुरू आहेत. अशातच पुणे व कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात पुन्हा गोळीबार झाला असून अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिक घाबरले. त्यासोबतच पोलिसांचीही धावपळ झाली.  पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई- बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर ८ वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केलाय. तर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. 



Source link