खून, बदला आणि रहस्यमय घटना; ‘काकुळ’ या थरारक मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!

0
22
खून, बदला आणि रहस्यमय घटना; ‘काकुळ’ या थरारक मराठी चित्रपटातून उलगडणार भयावह कथा!


सध्या सर्वत्र कौटुंबिक, रोमँटिक चित्रपटांची चलती असलेली पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकवर्ग रहस्यमय चित्रपटांना मिस करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. मात्र, आता प्रेक्षकांची हीच इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे. कारण, एक नवाकोरा रहस्यमय, हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. ‘काकुळ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. खून, अपहरण आणि बदला याचे चित्रण चित्रपटात केले असल्याचं पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ‘काकुळ’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून या चित्रपटातील थरार दिसत आहे.



Source link