खळबळजनक..! ‘महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड’ म्हणत सोसायटीत मराठी महिलेला घर नाकारलं, मुलुंडमधील प्रकार

0
16
खळबळजनक..! ‘महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड’ म्हणत सोसायटीत मराठी महिलेला घर नाकारलं, मुलुंडमधील प्रकार


मुंबई – महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याचा आदेश न्यायालयाने दिला असताना तसेच यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच मराठी माणसांना परप्रांतीयांकडून चक्क घरे नाकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे घडला आहे. या सोसायटीत मराठी माणसांना परवानगी नाही, अशी मुजोरी गुजराती व्यक्ती दाखवताना दिसत आहे. पीडित महिलेने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर गुजरातींना नमते घ्यावे लागले तसेच त्यांना महिलेची माफीही मागायला भाग पडले.



Source link