
अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकतीच एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले. श्रेयस तळपदे म्हणाला की, ‘मी स्वत:ला खूप घाबरलो होतो. हे दुर्दैवी आणि अनपेक्षित होते. मला खात्री होती की मी माझा आहार, व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेत आहे. अर्थात, लसीबद्दलही काही सिद्धांत आहेत. आपण त्याबद्दल ऐकत आलो आहोत. लोक बाहेर काम करत आहेत किंवा खेळत आहेत आणि अचानक त्यांना अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अगदी स्वत:ची काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही काहीतरी होतं.’







