
वैष्णव यांनी म्हटले की, कवचचे ५ घटक ऑप्टिकल फायबर, कवच टॉवर, स्टेशन्सवर डेटा सेंटर, ट्रॅकसाइड उपकरण आणि लोको कवच आहे. त्यांनी म्हटले की, या सर्व घटकांना स्थापित करण्यामध्ये मोठी प्रगती झाली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत २६९ कवच टावर स्थापना करण्याबरोबरच ३,०४० किलोमीटर मार्गांवर ऑप्टिकल फायबर केबल टाकले जातील. एकून १८६ स्टेशन्सवर डाटा सेंटर तयार करण्यात आले आहेत आणि ८२७ किलोमीटर रूटवर ट्रॅकसाइड उपकरण लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर १७० इंजनांमध्ये लोको कवच लावले आहे.








