
सध्या चित्रपटसृष्टीमध्ये इंडस्ट्रीमध्ये बायोपिकची क्रेझ पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक असे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘कर्मवीरायण’ असे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव आहे.







