
सत्यपाल मलिक यांनी पुढे लिहिले की, जर यावेळी तुम्ही संधी घालवली तर पुन्हा तुम्हाला कधी मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही. याआधी सत्यपाल मलिकने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, मी आधीच सांगितले होते की, निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल. सत्यपाल मलिक यांनी केजरीवाल यांच्या अटकेसाठी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिले होते की, सत्तेवर बसलेला हुकूमशहा डरपोक माणूस आहे. जो देशाच्या सरकारी एजन्सीचा गैरवापर करत आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करत मोदी सरकारने आपल्या शवपेटीवर अखेरचा खिळा ठोकला आहे.