
स्कॅम १९९२: हर्षद मेहता स्टोरी
‘स्कॅम १९९२: हर्षद मेहता स्टोरी” हा पहिला भाग हर्षद मेहताबद्दल होता. हर्षद मेहता आणि इतर स्टॉक ब्रोकर्सचा सहभाग असलेल्या १९९२च्या भारतीय शेअर बाजार घोटाळ्याचे वार्तांकन यात करण्यात आले होते. पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशीष बसू यांच्या ‘द स्कॅम : हू वॉन, हू लॉस्ट, हू गॉट अवे’ या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे. यात प्रतीक गांधीच्या ‘हर्षद मेहता’ या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. या ओटीटी सीरिजची थीम म्युझिक प्रचंड लोकप्रिय झाली होती. हंसल मेहता आणि जय मेहता यांनी या वेब सीरिजचे सहदिग्दर्शन केले होते.








