
केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुखकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे. या एफआयआरची दखल घेत ईडीने काल, शुक्रवारी वानखेडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. ‘याप्रकरणी आपण न्यायालयात योग्य ते उत्तर देऊ’, असं समीर यांनी म्हटलं आहे.





